• भाग १५७ - गजानन महाराजा, तुझे चरण देखिले गा !

  • Sep 18 2024
  • Length: 14 mins
  • Podcast

भाग १५७ - गजानन महाराजा, तुझे चरण देखिले गा !

  • Summary

  • भाग १५७ - गजानन महाराजा, तुझे चरण देखिले गा ! अनुभव - डॉ जयंत वेलणकर, नागपूर शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069 वाचन - पौर्णिमा देशपांडे प्रस्तुती - मी पॉडकास्टर ( नचिकेत क्षिरे) अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधीराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगांव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय आपल्या महाराष्ट्राचं भाग्य महान म्हणून आपल्याला अनेक थोर संत माहात्म्यांचं वास्तव्य लाभलं. श्री संत गजानन महाराज, शेगाव, हे असेच एक महान संत. 23 फेब्रुवारी 1878 साली अचानक गजानन महाराज शेगावात प्रगट झाले. रस्त्यावर बसलेला एक निवस्त्र पुरुष पाहून, लोकं साधारण काय करतील, तशीच वागणूक लोकांनी महाराजांना दिली. पण त्यापुढे 32 वर्षे अनेक लीला दाखवून, लोकांच्या पाठीशी त्याच्या संकट समयी उभं राहून, लोकंचे ते गजानन महाराज बनले,अनेक लोकं महाराजांचे निःसीम भक्त झाले. असं म्हणतात ह्या भूतलावरून जाण्याच्या 2 वर्ष आधीच महाराजांनी आपली जाण्याची तारीख आणि जागा सूचित करून ठेवली होती, आणि असेही सांगितलं होतं की मी तिथेच असणार आहे.. झालंही तसंच.. आजही श्री गजानन महाराज आपल्या सोबत असल्याचे अनुभव त्यांचा भक्तांना येतात.. बरेचदा अश्या अनुभवांबद्दल सांगितलेल्या गोष्टी ह्या केवळ कांन गोष्टी किंव्हा दंतकथा वाटू शकतात.. म्हणूनच असे अनुभव ज्यांना आले त्याच्याकडून ते ऐकून, ते शब्दांकित करून, परत त्यांना वाचून दाखवून, ज्यांना ते अनुभव आले त्यांचं नाव आणि फोन नंबर सकट अशे अनुभव छापून जास्तीत जास्त लोकांनं पर्यंत पोहचवण्याचे काम केले आहे नागपूच्या डॉ जयंत वेलणकर ह्यांनी. त्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर महाराजांनीच त्यांच्याकडून हे काम करून घेतलं.. डॉ जयंत वेलणकर हे 37 वर्ष वाणीज्यांविभागाचे प्राध्यापक होते. सेवानिवृत्ती नंतर त्यांनी आपलं आयुष्य श्री गजानन महाराज ह्यांच्या सेवेत समर्पित केलं.. ह्यांनी सगळ्या अनुभवांच संकलन करून ' श्रीगजानन अनुभव' ह्या पुस्तकाचे आत्तापर्यंत 2 भाग प्रकाशित केले आहेत. ह्याचं कामाला पूढे नेत, श्री गजानन महाराजांची प्रचिती अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून मी पॉडकस्टर घेऊन येत आहे 'श्री गजानन अनुभव हा श्राव्य पॉडकास्ट. आपण डॉ जयंत वेलणकर ह्यांनी शब्दांकित केलेले अनुभव...
    Show more Show less

What listeners say about भाग १५७ - गजानन महाराजा, तुझे चरण देखिले गा !

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.