Episodes

  • # 1584: नात्यांच्या गाठी. लेखिका सपना जकातदार. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Sep 27 2024

    ती नीट-नेटकी स्वच्छ रहायची. कुणाच्या अध्यात न मध्यात. लोकांच्या नजरेतली श्वापदं तिला घायाळ करायची. म्हणून तिनं एक डोरलं गळ्यात बांधलं होतं. रुपानं देखणी नव्हती पण तिचे टपोरे डोळे खूप बोलके होते.
    तिच्या उशाशी एक भली मोठी सुरी असायची. घाबरायचे तिला इतरजण. तिचा चण्डिकेचा अवतार पहिला होता त्यांनी.
    “जन्मली तेव्हा तिच्या हातावर आणि पाठीवर गाठ होती.. तुझ्या बापाला वाटलं, कॅन्सर असेल.एवढा खर्च पोरीवर कोण करेल?.. म्हणून सोडून आला कुठं.. ”
    “मरता-मरता गुन्हा कबूल केला त्यानं"..

    Show more Show less
    9 mins
  • "दाद ........" कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Oct 1 2024

    पुलं ना स्टेशन वरून घेऊन येणारा तो टांगेवाला होता. पुलं ना एवढा आनंद झाला वाळवंटात पाण्याचा झरा दिसावा अस त्यांना झालं .
    त्या माणसाला त्यांनी पुढे बसवलं सगळी रात्र त्या एकट्या माणसासाठी मैफल रंगवली.
    परमेश्वराने गाणं ऐकण्याचे बीज टांगेवाल्याचात टाकलं होतं.

    Show more Show less
    9 mins
  • # 1586: आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन. लेखक गणेश विसपुते. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Oct 1 2024

    भाषांतरकार मंडळी राष्ट्रांना एकत्र आणतात, संवाद सुलभ करतात, आणि शांततेत हातभार लावतात.
    साधं उदाहरण द्यायचं तर,
    वैज्ञानिक किंवा तांत्रिक काम एका भाषेतून दुसऱ्या भाषेत नेणं ही फारच महत्वाची गोष्ट आहे. त्यातूनच माणसं एकमेकांना चांगलं समजून घेतात, बोलतात, आणि एकत्र येऊन काम करतात.
    सेंट जेरोम हे बायबलचे भाषांतरकार आहेत त्यांच्या पुण्यतिथीला
    दरवर्षी 30 सप्टेंबर रोजी 'आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन' साजरा केला जातो.

    Show more Show less
    6 mins
  • # 1585: "खा माझ्या पुता" कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Sep 28 2024

    म्हातारी म्हणाली, "माका सत्तर मैलार जांवचा आसा. सोडशील रे? यष्टी चुकली बग!"
    ड्रॉयव्हर खाली उतरला. म्हातारीची पाटी डिकीत टाकली आणि तिला आपल्या बाजूच्या सीटवर बसायला सांगितलं.
    आजी हरकली. चक्क पुढं बसून जायचं? आणि गाडीत कोणी पॅसेंजर्स नाहीत.
    पण तिला हळहळपण वाटली. बिचाऱ्या ड्रॉयव्हरला आज मिळकतच नाही.
    ती म्हणाली, "ह्यां बग, यष्टीवाले दोन आने घेता.मियां तुका तीन आणे देतयं. चलात?''
    ड्रॉयव्हर हसत म्हणाला, "आजी, तुला परवडतील ते दे. तू मला मायसारखी.''

    Show more Show less
    5 mins
  • # 1583: माउंटन मॅन. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Sep 26 2024

    दशरथ मांझी यांचा बालविवाह झाला होता. गावातील एका जमीनदार व्यक्तीकडे दशरथ कामाला होते त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. डोंगराच्या एकीकडे गाव आणि पलिकडे त्यांच्या कामाचं ठिकाण होते. त्यांची पत्नी फगुनिया दररोज त्यांच्यासाठी डोंगर चढून जेवण घेऊन जात असे. एकेदिवशी जेवण घेऊन जाताना फगुनियाचा तोल गेला आणि ती डोंगरावरून खाली कोसळली. यानंतर काही दिवसांनी तिचं निधन झालं.

    Show more Show less
    6 mins
  • # 1582: त्या परीक्षेची तयारी करा..! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Sep 25 2024

    शेखर कपूर आपला फोन घेऊन निघत असताना आपल्या विस्कटलेल्या केसांवर हात फिरवत तो पोरगा म्हणाला, “सरजी, ब्लॅकबेरी इस्तेमाल करना है तो हाथ साफसुथरे होने चाहिये. गंदे हाथसे इस्तेमाल करोगे तो ये प्रॉब्लेम आ सकता है.” ज्यानं कदाचित मागच्या पूर्ण आठवडाभर आंघोळ केली असावी की नसावी, असा संशय यावा, असा तो फाटका पोर कपूर साहेबांना सांगत होता. शेखर कपूर लिहितात, “ही एवढीशी फाटकी पोरं जगातील कोणतंही आधुनिक तंत्रज्ञान अवगत कसं करतात ?मला त्यांच्या डोळयांत माझ्या देशाचं भविष्य दिसत होतं. या पोरांची ही क्षमता विकसित केली पाहिजे, मला जाणवलं. ‘साहेब फोन वापरण्यापूर्वी हात स्वच्छ धुत चला’, तो पोरगा पुन्हा एकदा म्हणाला. आणि मला माझे हात खरोखरच खूप अस्वच्छ वाटू लागले.”

    Show more Show less
    8 mins
  • # 1581: उपरती. लेखक : अज्ञात. कथन: (सौ.मधुरा कुळकर्णी)
    Sep 24 2024

    "अती घाई संकटात नेई "
    माणूस वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असतो. प्रत्येक क्षेत्रात काम करत असताना निर्णय घेण्याची क्षमता असणे आवश्यक असते. कारण एक चुकीचा निर्णय माणसाचे आयुष्य त्याच्या स्वप्नांची दिशा बदलण्यास कारणीभूत होवू शकतो.
    काही वेळेस एखादी व्यक्ती किंवा एखादा सुविचार आपल्याला आपल्या ध्येयाच्या दिशेने नेण्यास कारणीभूत ठरतात.
    अशीच एका राज्याच्या धुंदीत असलेल्या राजाची ही कथा..

    Show more Show less
    5 mins
  • # 1580: राष्ट्र मजबूतीचा संकल्प. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Sep 24 2024

    मी त्याच्या उजव्या हाताला बी पी कफ बांधू लागलो. फोर आर्मवर एका जखमेचा वेडावाकडा व्रण मला दिसला.
    "इधर क्या हुआ था?"
    "गोली लगी थी साहब."
    मी उडालोच, "यह गोली का जखम है?"
    "एक नही साहब, छह लगी थी. यहाँ से यहाँ तक ब्रश फायर लगा था." त्याने आपला डाव्या हाताच्या तर्जनीने उजवा हात, उजवा खांदा, उजवी छाती आणि शेवटी डाव्या खांद्यापर्यंत निर्देश केला.
    "बाप रे, फिर बचे कैसे? आप तो सनी देओल हो."
    "काहे का सनी देओल साहब! इतना खुन बहा था की मुझे मरा समजके छोड दिया था. मेरा नसीब अच्छा था की वक्त पर डाक्टरने देखा और फस्ट एड किया. हॉस्पिटल के लिए एअर लिफ्ट मिली इसलिए वक्त पर सर्जरी हो पाई. नही तो उस दिन मै खत्म हुआ था."

    Show more Show less
    11 mins