• EP 68 - Motivation Vs Actions
    May 30 2024

    भाग ६८

    मोटिवेशनल व्हिडिओस बघून आपण लगेच कामाला लागतो का ?

    मोटिवेशनचा डोस किती वेळ टिकतो ?

    काम करायला, सुरवात करायला मोटिवेशन आवश्यक आहे का ?

    अनुभव असं सांगतो कि मोटिवेशनचा डोस काही वेळात टाय टाय फीस होतो आणि आपण परत जैसे थे होतो.

    Motivation does not cause action, action motivates you to take further action ह्या अमृत देशमुखच्या वाक्यावर ह्या भागात ऊहापोह केला आहे.

    नक्की ऐका.

    Show more Show less
    7 mins
  • EP 67 - Find Your 'Why'
    May 26 2024

    भाग ६७


    Find Your 'Why'


    Apple, Nike, Bose , Old Monk , ह्या सगळ्यांमध्ये काय साम्य आहे ?


    ह्या सगळ्यांना एक कल्ट following आहे.


    पण त्यांनी हे कसं केलं ?


    सायमन सिनेक या लेखकाचे ‘स्टार्ट विथ व्हाय हे पुस्तक जगप्रसिद्ध आहे. त्यात त्याचे म्हणणे आहे, की ‘आपण कुठलीही गोष्ट ‘का’ करतो हे आधी माहिती हवं आणि मग ती कशी करायची हे आपण, आपणहून शोधून काढतो. त्याने बऱ्याच व्यावसायिक संस्थांचे उदाहरण त्यात दिले आहेत, जसे अँपल. अँपलला कल्ट फॉलोइंग आहे. त्याची काय कारणं आहेत याबद्दल विस्तृतपणे पुस्तकात दिले आहे, पण मुख्य मुद्दा हाच आहे की, कुठलंही काम करायच्या आधी आपल्याला आपण ते का करतो आहे, हे माहिती हवं. आपल्याला ‘का’ करायचं हे माहिती असलं की काय आणि कसे हे आपण शोधून काढतो.

    त्याने जी उदाहरणे दिली आहेत, ती सगळी अमेरिकन असल्यामुळे मी आपल्या उदाहरणांना हे लागू होतंय का याचा विचार करून बघितला आणि ते अक्षरशः खरं आहे, असं माझ्या लक्षात आलं. आजच्या भागात त्या बद्दल थोडा ऊहापोह केला आहे.

    Show more Show less
    11 mins
  • EP 66 - Justice Vs Forgiveness / परत सुरवात करूया
    May 21 2024

    कधी एखादी गोष्ट मनाप्रणारे झाली नाही, अर्धवट राहिली, कोणी धोका दिला, त्रास दिला तर आपण त्याचं विचारात जन्मभर जगतो. सतत बदल्याची भावना मनात असते.


    मधमाश्या ह्या एवढासा जीव, त्यांनी मेहेनतीने बनवलेलं पोळ काही क्षणात कोणीतरी तोडून घेऊन जातं, पण मधमाश्या कधीही मागचा विचार न करता, लगेच परत एकदा नवीन पोळ तयार करायला लागतात. आपण मधमाश्यांकडून हे शिकू शकतो का ?


    झालेली गोष्ट विसरून परत एकदा आपण कमला लागलो तर जास्त फायदा होईल का ? ऐकूया आजच्या भागात




    Show more Show less
    11 mins
  • EP 65 - कठीण निर्णय घेताना
    May 18 2024

    आयुष्यात कठीण प्रसंगी निर्णय घेणं फार अवघड काम आहे. आपला निर्णय चुकला तर काय होईल ह्या भीतीने आपण बरेचदा निर्णयच घेत नाही. पण निर्णय न घेण्याने आपण बरेचदा आलेली संधीला मुकतो.

    डॉ शारदा बापट ह्यांच्या बरोबर झालेल्या गप्पांमध्ये बरंच काही शिकलो, पण प्रामुख्याने एक फॉर्मुला शिकलो, ज्याचा उपयोग निर्णय घेण्यात नक्कीच होतो आहे.



    Show more Show less
    5 mins
  • EP - 64 -Perfection Vs Consistency
    May 10 2024

    Perfection Vs Consistency


    भाग २ मध्ये मला मेहक मिर्झा प्रभू हिच्याशी गप्पा करायची संधी मिळाली. तीन गोष्टी ह्या भागातून मला प्रकाशाने शिकायला मिळाल्या



    १) आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर, अगदी ध्यानी मनी नसताना, आपल्याला आपली passion सापडू शकते.

    ३) प्रयत्न करताना जरी फेल झालो तरी स्वतः वर प्रेम करणं सोडू नका

    ४) सातत्य हे perfection पेक्षा जास्त महत्वाचं आहे.


    मेहेक सोबतच्या ह्या गप्पा ऐकण्यासाठी भाग २ नक्की ऐका कारण हा खूप पॉवर प्याकडं भाग झाला आहे.


    Show more Show less
    8 mins
  • EP 63 - अडचणींवर मात करतांना
    May 4 2024

    नमस्कार, ४ मे २०२० ह्या दिवशी इन्स्पिरेशन कट्टा चा पहिला एपिसोड आला होता. गेल्या ४ वर्षात माझ्या आयुष्यात अनेक चांगले बदल घडले, आणि ह्याला निश्चित कारण म्हणजे इन्स्पिरेशन कट्टा.


    ह्या पॉडकास्ट मधून मला स्वतःला इतकं शिकायला मिळलं की ' जो जे वांछील' हे पुस्तक त्यातून मी लिहू शकलो.


    ४ मे २०२० ह्या दिवशी माझे हात थरथरत होते, खूप भीती वाटत होती, त्या सिटूएशन पासून, अँपल पॉडकास्ट च्या चार्ट वर १ नंबर वर येणे, नेक्स्ट बिग क्रिएटर अवॉर्ड मिळणे, दोन पुस्तक प्रकाशित होणे हा सगळा प्रवास भन्नाट होता.

    इन्स्पिरेशन कट्टा वर परत एकदा आपण नवीन पाहुण्यांसोबत गप्पा करायला लवकर भेटणार आहोत, पण त्या आधी आपल्या जुन्या एपिसोडचा रिकॅप बघुयात, म्हणजे तुम्ही एखादा एपिसोड ऐकला नसेल तर त्यातला सार इथे मिळेल.


    ह्या सिरीयस चा हा पहिला एपिसोड.



    Show more Show less
    10 mins
  • EP 62 - कॉर्पोरेट जॉब ते आवडते काम - मार्ग कसा शोधावा ? Ft -Sharayu Sawant
    Nov 24 2023

    कॉर्पोरेट मध्ये काम करता आहे का ?


    वयाची तिशी पार केली आहे ?


    असं असेल तर हा एपिसोड तुमच्यासाठी आहे.


    कॉर्पोरेट जॉब मध्ये कंटाळा येणं, निराशा येणं, वरिष्ठांशी भांडण होणं, नको तितक्या स्पर्धेचा तिटकारा येणं असे अनेक प्रकार खूप घडतात.


    त्यातून पुढे चुकीचे निर्णय घेणं, नैराश्य येणं, वर्क-लाईफ बॅलेन्स बिघडणं अशे प्रकार घडतात. त्यांचा परिणाम घरी भांडण, मुलांवर चिडचिड आणि मानसिक आजार ह्या पर्यंत होतो.


    ज्या वेळेला पहिल्यांदा असं वाटायला सुरवात होते ना कि हे काम माझ्या साठी नाही, त्या वेळेलाच ह्या सगळ्याची सुरवात कदाचित झालेली असते. पण आपण ते सहन करत राहतो आणि एक दिवस ज्याला टिपिंग पॉइंट म्हणतात तिथे येऊन आपण पोहचतो. त्यापुढे सहन करत राहणं ह्या शिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो कारण आपल्यावर जबाबदाऱ्या आलेल्या असतात.


    टिपिंग पॉइंट पर्यंत पोहचण्या आधीच आपण बाहेर पडू शकतो का? स्वतः साठी वेगळे पर्याय शोधू शकतो का? कुठलं काम आवडत आहे ह्याचा शोध आधीच घेऊन ठेऊ शकतो का ? comfort zone च्या बाहेर पडायला काय लागत ?


    ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न ह्या भागात आपण केला आहे.


    आजची आपली पाहुणी शरयू सावंत हि अनेक वर्षांचा कॉर्पोरेट अनुभव घेऊन आता स्वतः एक लाईफ कोच बनली आहे आणि ती लोकांना आणि विशेषतः महिलांना करिअर आणी व्यवसायासंबंधी कोचिंग करते.


    Instagram: https://www.instagram.com/iamsharayusawant


    PODCAST LINK:

    Apple Podcast: https://apple.co/3g9fekx Spotify: https://spoti.fi/3gpYdS5


    FREE EBBOK: 'EMBODIED SUCCESS' The Art of Overcoming Limitations & Stress to Achieve Greater Success & Abundance https://go.sharrayu.com/ebook-optin



    पुस्तकं विकत घेण्यासाठी लिंक्स


    जो जे वांछील - https://amzn.to/3QVShUq


    पॉडकास्टिंग - डिजिटल आवाजाची दुनिया - https://amzn.to/49DUj2X




    ऑडिओ लोगो क्रेडिट - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_



    #inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी






    Show more Show less
    51 mins
  • EP 61. - जिद्द - अरुणिमा सिन्हाची गोष्ट
    Nov 5 2023

    आपलं ध्येय सध्या न करण्यासाठी आपण स्वतःला कोणतं कारण देतो आहे ?


    वेळ नाही ! नशीब नाही ! गाईड मिळत नाही ! की इतर कोणतं कारण ?


    एकदा अनुरिमा सिंन्हा आणि तिच्या जिद्दीची हि गोष्ट ऐका आणि मग स्वतःच कारण किती योग्य आहे ते ठरावा.




    ऑडिओ लोगो क्रेडिट - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/





    #inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी Marathi Podcast । मराठी पॉडकास्ट


    Show more Show less
    19 mins